आज रविवार ऑफिस ला मस्त सुट्टी. सुट्टीची संध्याकाळ आभाळ भरून आलेल विजेच्या कडकडाटा सह पावसाल सुरुवात झालीये.उन्हाळाच्या प्रचंड उकाड्या तून सुटकेचा निश्वास टाकत सगळीकडे गारवा पसरला.वीजेच्या कडकडाटा सह पाऊस सुरु झाला.खिडकीत बसून पाऊस बघताना अचानक गरम गरम भजी आणि वाफाळलेला चहा (अगदी कादंबरी सारखे बरका) समोर आल, आणि चहाचा एक एक घोट घेत वाऱ्याच्या झोता बरोबर मन भूतकाळात डोकाऊ लागल.मग आठवले ते महाबळेश्वर, ऐन पावसाळ्यात महाबळेश्वर मध्ये प्रचंड पावसात भिजत सहचारिणी बरोबरचे ते क्षण ,धुक्याच्या धुलइत वेण्णालेक चा नजरा ,गरम गरम कणीस व चणे . मन थोड आणखी माग गेल आणि आठवली मैत्रिणी बरोबरची वर्षा सहल कॉलेज बंक करून दोघांचेच गाडीवरून पावसात भिजत फिरायला जाणे. व टपरीवरची चहा भजी. वाऱ्याच्या झोताबरोबर मन आणखी माग गेल आणि ते पोहचल बालपणात तेव्हाचा धो धो पाऊस शाळा सुरु होण्याचा दिवस पावसातच शाळेच्या नवीन वर्गाची तयारी पावसात भिजत नवीन पुस्तके वह्याची खरेदी नवीन गणवेशाची तयारी आणि पावसातच शाळेच्या पहिल्या दिवशीचे आगमन .पाठीवर चटा चटा चीखलाची नक्षी आणि चिखल बघून फुटबॉलचा खेळ, त्याच चिखलात पाडापाडी अन घरी शर्टाची अवस्था पाहून आईचा ओरडा.तर कधी चालताना घसरून पडणे व कोणी पाहत तर नाहीना बघून हळूच उठून पळणे.पण आजीन करून दिलेली पोत्याची खोळ मात्र अजूनही विसरत नाही ना...मन थोड अजून पाठीमाग गेले ते स्वच्छंदी बालपण मित्रान सोबत पावसात भिजणे होड्या करून पाण्यात सोडणे गाराच्या पावसात गारा वेचून खाणे. चिखलातून पाण्याला वाट काढून देणे आणि पावसाळा स्पेशल असे खेळ खेळणे अर्थात दंग मस्ती करणे ..........................पहा तोच पाउस पण पावसाची रूपे कशी वेगवेगळी भासतात नाही !
तेव्हड्यात जोरदार वीज पडल्याचा आवाज झाला पण कणभर का कुणाश ठाऊक तो मला माझ्या बायको सारखा वाटला हो पुन्हा आवाज आला तसाच पण यावेळेस तो जरा स्पष्टच आला “ आहो उठा झोपालयात काय शुंभा सारखे मगास पासन हाका मारतेय उठा आपल् पुत्ररत्न बघा मागास पासून पावसात खेळतय सर्दी ताप झाला तर कोण निस्तरणार दोन दिवसात शाळा सुरु आहे शाळा बुडली तर टीचर मला बोलतात आणि उठा दुध संपलय चहा हवा असेल तर दुध घेवून या आणि हो बेसनपीठ पण आणा पिठल करायचय भाजी (भजी नव्हेत बरका) नाही घरात, उठता का आता ” आता सारा मामला पाऊस पडून गेल्यावर सकाळी स्वच्छ ऊन पडल्या सारखा समोर आला पाऊस खरा होता पण नंतरच सगळ स्वप्न होते.व ते तेथेच पावसाच्या गारे सारखे विरघळून गेले होत .
No comments:
Post a Comment